पुणे : शिक्षण विभागाने (department of education maharashtra) राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी आता मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. तसेेच आधार वैधतेसाठी मुदत मिळाल्याने विद्यार्थीसह शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.( Extension of Aadhaar Card Validity for Students)
Pune-Mumbai Deccan Queen Birthday । पुणे-मुंबई डेक्कन क्वीन झाली आवघ्या 93 वर्षांची
करोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona outbreak) गेली दोन वर्षे संचमान्यता प्रक्रिया होऊ शकली नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची संचमान्यता (General recognition for the academic year 2023-24) आधार वैधतेनुसार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील तपशिलातील त्रुटी दुरुस्त करणे आदी प्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचेही दिसून आले आहे.
आधार वैधतेनुसार संचमान्यता केल्यास आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे कमी होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच राज्य शिक्षण मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आधार पडताळणी नुसार संच मान्यता दिली जाईल, असे सांगितले.