पूर्णा-परळी, नांदेड-बीदर विस्तार करा

परभणी : लॉकडाउन पूर्वी नियमित सुरू असलेली पूर्णा-परळी रेल्वे (Purna-Parli Railway) येत्या काही दिवसांत पूर्ववत सुरू होणार आहे. त्या रेल्वेला दोन्ही बाजूला विस्तार करून नांदेड-बिदर अशी चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाने केली आहे. (Extend Purna-Parli, Nanded-Bidar)

 

सायंकाळच्या वेळी परभणी येथून परळीला रोज अप-डाऊन करणार्‍या हजारो प्रवाशांना सोयीची पूर्णा-परळी दैनंदिन गाडी लॉकडाऊननंतर पुन्हा सुरू होणार आहे. ही रेल्वेमुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र परळी येथून परत येतांना या रेल्वेच्या अगोदर हैदराबाद-पूर्णा, पंढरपूर-निजामाबाद, आणि बेंगलूरू-नांदेड अशा तीन-तीन रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे परळी-पूर्णा रेल्वे रिकामी धावत आहे. तरी सदर रेल्वेला लोकाभिमुख करण्यासाठी पूर्णा-परळी रेल्वेला नांदेड-बीदर असे दोन्ही बाजूला विस्तार करण्यात यावेत. (Extend Purna-Parli, Nanded-Bidar)

 

 

सदर रेल्वेला नांदेड येथून दुपारी सुमारे 3 ला रवाना करून पूर्णा 4, परभणी सायंकाळी 4.45, गंगाखेड 5.40, परळी 6.30-6.40, लातूर रोड 7.40, उदगीर रात्री 8.30, भालकी 9.20 तर अखेर बीदर येथे रात्री सुमारे 10.30 पर्यंत पोहोचवण्यात यावेत. परतीत बीदर-नांदेड रेल्वेला बीदर येथून सकाळी सुमारे 5 वाजता रवाना करून भाल्की 5.40, उदगीर 6.30, लातूर रोड 7.20, परळी 8.20-8.30, गंगाखेड 9.20, परभणी 10, पूर्णा 10.40, आणि अखेर नांदेड येथे दुपारी 12 ला पोहोचविण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डा. राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, रूस्तुम कदम, श्रीकांत गडप्पा, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित, कादरीलाला हाशमी, रवींद्र मूथा, इत्यादींनी केली आहे. (Extend Purna-Parli, Nanded-Bidar)
Local ad 1