...

जमिनीखालील बियर (Beer bottles) पडली महागात, एकाचा मृत्यू

रायपूर :  दारुचे व्यसन असेल तर कोणत्याही स्तराला जाऊन दारु मिळवली जाते. मात्र, फुकटात बीयरच्या बाटल्या  (Beer bottles) मिळाल्यावर कोण सोडतं. अख्खा गावाने बीयरच्या बाटल्या लुटल्या. मात्र, त्यावरील एक्सपायरी डेट कोणीही पाहिली नाही. जेंव्हा ती बियर एक्सपायर झालेली असल्याची माहिती समोर आली. तोपर्यंत एकाला आपला जीव गमवावा लागला. (Death of a villager) तर इतरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. 

 

 

जोरदार पाऊस झाल्यामुळे गावच्या उकिरड्यापाशी साठलेला कचऱ्याचा ढीग आणि माती वाहून गेली. त्या ठिकाणी काही बिअरच्या बाटल्या (Beer bottles)  ग्रामस्थांना दिसल्या. त्यांनी त्या बाटल्या उचलल्या, तेव्हा त्याखाली आणखी काही बाटल्या असल्याचे लक्षात आले. मग या ग्रामस्थांनी तिथली जमीन खोदायला सुरुवात केली. ही माहिती काही वेळातच वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. हा प्रकार छत्तीसगडमधील (Chattisgarh) बलौदाबाजार गावात घडला आहे.

 

जमीन खोदल्यानंतर तिथून सुमारे ट्रकभर बियरच्या बाटल्या (Beer bottles) सापडल्या. फुकटातील बीयर म्हणून ग्रामस्थ अक्षरशः त्यावर तुटून पडले आणि सर्व बाटल्या गावकऱ्यांनी लुटून नेल्या. ही दारू प्यायल्यामुळे गावातील तरुण ललित यदू याचा मृत्यू झाला, तर अनेक गावकऱ्यांना रुग्णालयात भार्ती करावे लागले.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या बाटल्या तस्करीच्या असून महसूल विभागाने उत्तर देण्याची मागणी विरोधकांनी केली. तर तस्करीच्या बाटल्या असत्या, तर त्या एक्सपायर होईपर्यंत तिथे राहिल्या नसत्या, असा दावा महसूल विभागातील अधिकारी करत आहेत. मुळात त्या बाटल्या गावात कधी आणि कुणी जमिनीखाली गाडल्या, त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. (Beer bottles)

Local ad 1