...

Expansion of the State Cabinet शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच होणार विस्तार ?

कोणाला मिळणार संधी ?

Expansion of the State Cabinet । महाविकास आघाडी सरकार उलथून राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांनी सुरुवातील काही मंत्र्यांसोबत शपथ घेतली. त्यानंतर सुमारे एक महिन्यांनी पहिला विस्तार झाला. आता लांबलेला दुसरा विस्तार (Expansion of the State Cabinet) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात एकनाथ शिंदे – देवेंद्र  फडणवीस सरकार (Eknath Shinde – Devendra Fadnavis Govt) सत्तेत आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला  (Expansion of the State Cabinet) मुहूर्त काही मिळाला नाही. त्यामुळे इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी (Shiv Sena Anniversary) राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार  (Expansion of the State Cabinet) होण्याची  शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार  तोही छोटेखानी असेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी ओढावण्याची भिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.
 

 

 

मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची  माहिती समोर येत आहे. आताच्या मंत्रीमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) तर दोन  हे राज्यमंत्री (Minister of State) आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदर राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे. (Expansion of the State Cabinet)

Local ad 1