...

मतदान करा आणि आईलच्या किंमतीवर मिळवा 50 रुपयांची सूट

पेट्रोल, जेवणावर मिळाणा 10 टक्के सवलत

पुणे : शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मतदान केलेल्या व्यक्तींना पेट्रोल पंपावर एक लिटर इंजिन ऑइल खरेदी केल्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत आणि हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलात १० टक्के सवलत दिली जाणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवात पुणेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. (Exercise your right to vote and get Rs 50 discount on oil price )

 

मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेत सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. पुणे नागरिक मंचचे (Pune Citizens Forum) विशाल नलकरे, रोहित नऱ्हा आणि समीर खरे, पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाचे सुहास पटवर्धन, पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे ध्रुव रूपारेल, आर्ट ऑफ लिव्हींगचे राजे शास्त्रे, पुणे रेस्टॉरेंटर्स अँड हॉटेल्स असोसिएशनचे गणेश शेट्टी (Ganesh Shetty of Pune Restaurants and Hotels Association), पुणे हॉटेल असोसिएशनचे अमितकुमार शर्मा, ‘क्रेडाई’चे रणजित नाईकनवरे यांनी मतदार जागृतीविषयी संघटनांची भूमिका विशद केली.

 

नलकरे म्हणाले, शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करीत आहोत. या अभियानात ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, हास्य क्लब आणि गृहनिर्माण संस्था जोडल्या गेल्या आहेत. पटवर्धन म्हणाले, गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदान वाढण्यासाठी तीन महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सोसायटी स्तरावर ‘सहकार मित्र’ नेमले आहेत. समाज माध्यमांचाही उपयोग करून घेतला जात आहे.

 

 

 

रूपारेल म्हणाले, मतदान केलेल्या व्यक्तींना पेट्रोल पंपावर एक लिटर इंजिन ऑइल खरेदी केल्यास ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे. तसेच, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या व्यक्तींना हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलात १० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. असोसिएशनच्या सदस्य असलेल्या हॉटेल आणि पंपावर ही सवलत मिळणार आहे. या सर्व संस्था-संघटनांतर्फे मतदानाच्या विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट तयार करण्यात येणार आहेत. सोसायटी पातळीवर ‘वॉर रूम’ उभारण्यात येणार आहे. तसेच, पोस्टर स्पर्धाही घेण्यात येणार असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

 

 

Local ad 1