...

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू अढळल्याने खळबळ  

 

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनमध्ये (Pune Railway Station) बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटीनच्या कांडया आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक  (Bomb Squad) असून, सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, डॉग स्कॉड सुद्धा दाखल झाले. (Excitement over discovery of bomb-like object at Pune railway station)

 

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने पोलिसांनी संपूर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर रिकामा करण्यात आला. सुमारे 11 वाजल्यापासून हा सर्व प्रकार सुरु असून सव्वा बारा वाजता बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ही संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आहे. त्यात कोणतेही स्फोटक नसून फटाक्यासारखे क्रॉकर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Excitement over discovery of bomb-like object at Pune railway station)

पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आले. प्रवाशांना सध्या तरी तेथे प्रवेश दिला जात नाही. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. (Excitement over discovery of bomb-like object at Pune railway station)

Local ad 1