Maharashtra State Excise Department। गावठी दारू विरोधात उत्पादन शुल्कची विशेष मोहिम ; तीन ठिकाणांवर नऊ आरोपींना अटक

Maharashtra State Excise Department : जिल्ह्यात हातभट्टी दारु तयार करुन त्याची वाहतूक व विक्री केली जात आहे. या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise of Maharashtra) विशेष मोहिम राबवली जात आहेत. त्यात तीन ठिकाणी कारवाई करून सुमारे साडेचार लाख रुयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई भरारी पथक क्र, २ ने केली आहे. (Excise Department Excise action against Gavhti Daru)

 

 उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार काळेपडळ गावच्या हद्दीत, रेल्वे गेट, साईबाबा मंदिरासमोरील रोडवर हातभट्टी दारुची वाहतुक करणार अशी बातमी मिळाल्यानुसार गस्त घालुन बजाज कंपनीचा एम एच -१२, एस के ९७२० तीन चाकी टॅम्पोसह गावठी दारु वाहत्क करणान्या आरोपी अभषेक उध्दव झगडे (वय २३ वरषे, रा. स,नं.३०४/२, म्हसोबा मंदिर समोर, म्हसोबानगर, काळेपडळ, हड़पसर, पुणे-२८)  याच्या ताब्यातुन तीन चाकी टॅम्पो व ५६० लि. गावठी दारु असा , २ लाख २८ हजार ८०० रुपयांचा  मु्देमाल जप्त केला आहे.

 

Zilla Parishad Bharti 2023। जिल्हा परिषद नोकर भरती अभ्यासक्रमात झाला बदल ; काय ते जाणून घ्या

अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार काळेपडळ ढेरे कंपनीजवळ गावठी दारु निर्मिती ठिकाणावर छापा मारुन २४०० लि. रसायन, १७५ लि. गावठी दारु व इतर गावठी दारु निर्मिती साहित्य असा ६३ हजार ७०० रु.किंमतीचा मुद्देमालासह भट्टी मालकासह इतर २ आरोपी अटक केले तसेच गावठी दारु विक्री व साठा करणारा १ आरोपीस अटक केले असे एकूण ०५ आरोपीस अटक केले. तसेच  २ लाख ९८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Excise Department Excise action against Gavhti Daru)

 

 बहुली गावच्या हद्दीत मुठा नदी जवळ, मोकळया जागेत, ता. हवेली येथे गावठी दारु निर्मिती ठिकाणावर छापा टाकून २ आरोपीच्या ताब्यातून ५४०० लि. रसायन व २८० लि. गावठी दारु, २०० किलो तुरटी, १८० किलो नवासागर व इतर गावठी दारु निर्मिती साहित्य असा १ लाख ४० हजार ५५० रु. किंमतीचा मु्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने दिलेल्या माहितीन्सार गावठी दारु साठा व विक्री करणार ठिकाण वारजे माळवाडी गावच्या हद्दीत, अमर भारत सोसायटी, बालाजीलक्ष्मण शिरमेवाड यांच्या घराच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये वारजे माळवाडी, पु्णे छापा मारुन १८५ लि.गावठी दारू असा  ९ हजार ५०० चा मु्दमाल जप्त करुन एका आरोपीस अटक करण्यात आली.,

 

 एकूण ३ गुन्ह्यात १ हजार ३८० लि. गावठी दारु, ७८०० लि. रसायन, २०० किलो तुरटी, १८० किलों नवसागर असा एकुण ४ लाख ५४ हजार १६० किमतीचा मु्देमाल जप्त केला आहे. (Excise Department Excise action against Gavhti Daru)
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (Commissioner of State Excise Dr. Vijay Suryavanshi)  पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त मोहन वर्दे (Mohan Varde, Divisional Deputy Commissioner of Pune Division), अ्धीक्षक चरणसिंग राजपुत, उपअधीक्षक संजय पाटिल, युवराज शिदे, एस. बी. जगदाळे यांच्या मागदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे या पथकाने केली. कारवाईत निरिक्षक तानाजी शिंदे, बाळासाहेब नेवसे, आर. डी. भोसले, जवानस्टाफ एस. बी. मांडेकर, के, आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, ए. आर. सिसोलेकर यांचा सहभाग घेतला. (Excise Department Excise action against Gavhti Daru)
Local ad 1