(Everyone should strictly enforce the curfew) सर्वांनी संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी : डॉ. विपीन इटनकर
नांदेड : जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नागरीकांनीही जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी अहवाल 4 हजार 924 तपासण्यांमधून 1 हजार 165 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. (Everyone should strictly enforce the curfew)
सोमवारी 22 मार्च रोजी साईनगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका महिलेचा, हदगाव येथील 64 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवार 23 मार्च रोजी मुखेड तालुक्यातील चावणवाडी येथील 60 वर्षाच्या एका पुरुषाचा, साईबाबा मंदिर रोड नांदेड येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर बुधवार 24 मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथील 45 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर माहूर येथील 71 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 674 एवढी झाली आहे. (Everyone should strictly enforce the curfew)
बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 23, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 392, धर्माबाद तालुक्यांतर्गत 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 16, हदगाव कोविड रुग्णालय 4, देगलूर कोविड रुग्णालय 5, बिलोली तालुक्यांतर्गत 3, खाजगी रुग्णालय 32 असे एकूण 486 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के आहे. (Everyone should strictly enforce the curfew)
उपलब्ध खांटाची माहिती ः बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. (Everyone should strictly enforce the curfew)
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 85 हजार 53
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 43 हजार 649
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 35 हजार 502
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 779
एकुण मृत्यू संख्या-674
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.42 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-29
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-68
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-410
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 816
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-62.
डाॅक्टरांची नियुक्ती – शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Everyone should strictly enforce the curfew)