पुणे : मागील दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देत विकासाच्या मार्गावर आहे. विरोधक संविधानाच्या मुद्द्यावर समाजात फेक नरेटीव्ह पसरवत आहेत. मात्र, आंबेडकरी समाजाला माहीत आहे संविधान शक्य नाही, यामुळे आंबेडकरी समाज एकजुटीने महायुती सोबत आहे, पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे यांची कामगिरी उत्तम असून, त्यांचा विजय पक्का आहे. त्यांच्या मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आ) संपूर्ण ताकद उभी करु असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Union Minister of State Ramdas Athawale) यांनी अश्वासन दिले आहे. (The entire strength of RPI will stand behind MLA Sunil Kamble)
राज्य उत्पादन शुल्क विभागाची दमदार कामगिरी ; ८४३ व्यक्तींना अटक
यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले, मागील पाच वर्षात कॅंटॉन्मेंट मधील अनेक समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे. तरुणांच्या हातात काम असेल तर देशाचा विकास होतो. म्हणूनच केंद्र सरकारच्या कौशल्य विभाग आणि आपल्या संकल्पनेतून तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने कॅन्टोन्मेंट मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते, या मेळाव्यात जवळपास 6000 लोकांनी आणि शंभरहून अधिक नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून अडीच हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली, याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यातही कॅंटॉन्मेंटचा विकास करण्यासाठी मतदार संधी देतील असा विश्वास कांबळे यांनी यावेळी व्यक्त केला.