महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातून 600 युवकांना मिळणार प्रशिक्षण (training)
नांदेड : कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून नांदेड जिल्ह्यांमध्ये 600 युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे. ( The training will provide employment to 600 youth)
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy cm ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय वजिराबाद येथे 12 वी साठी योगा वेलनेस ट्रेनर, योगा थेरपी असिस्टंट, पंचकर्मा टेक्निशियन, 10 वीच्या युवकांसाठी क्षारा कर्मा टेक्निशियन, कूपिंग थेरपी असिस्टंट, आयुर्वेदा आहार ॲन्ड पोशक सहायक, 8 वीच्या युवकांसाठी असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर, बीएएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदा डायटीशीयन तर द क्रिसेंट ब्लड सेंटर येथे 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल डयुटी असिटंट (ॲडव्हान्स) या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण होणार आहे. (The training will provide employment to 600 youth)
जिल्ह्यातील इच्छूक पात्र युवक-युवतीनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्र नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा 02462-251674 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. (The training will provide employment to 600 youth)