Employment fair। सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी गुरुवारी लोहा व कंधारमध्ये मेळावा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे (Chief Minister's Employment Generation Programme) स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार (Panchayat Samiti Hall Loha, Panchayat Samiti Hall Kandahar) येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
Employment fair नांदेड : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे (Chief Minister’s Employment Generation Programme) स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी गुरुवार 28 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह लोहा व पंचायत समिती सभागृह कंधार (Panchayat Samiti Hall Loha, Panchayat Samiti Hall Kandahar) येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे (General Manager of District Industries Center Amol Ingle) यांनी केले आहे. (Employment fair for youth in Loha and Kandahar on Thursday)
या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.
Shetkari Aakrosh Morcha । पुण्यात महाविकास आघाडीचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ निघणार
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकुण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे.
मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.