भोकर विधानसभा मतदार संघाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष ! उमेदवारी अर्ज माघारीनंतर किती EVM लागणार स्पष्ट होणार 

भोकर विधानसभा मतदार संघात  (Bhokar Assembly Constituency) तब्बल 167 अर्ज दाखल झाले होते. हे राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदार संघात सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचा विक्रम मानला जात आहे. मात्र, अर्ज छाननीमध्ये 110 अर्ज वैध ठरली तर तब्बल 57 अर्ज विविध कारणांनी अवैध ठरली.  मात्र, त्यानंतर 17 अपक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांनी भरलेला डमी अर्जाचा समावेश आहे. त्यामुळे आता 93 अर्ज दाखल आहेत. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे.