भोकर विधानसभा मतदार संघाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष ! उमेदवारी अर्ज माघारीनंतर किती EVM लागणार स्पष्ट होणार 

नांदेड – उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यत भोकर विधानसभा मतदार संघात  (Bhokar Assembly Constituency) तब्बल 167 अर्ज दाखल झाले होते. हे राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदार संघात सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याचा विक्रम मानला जात आहे. मात्र, अर्ज छाननीमध्ये 110 अर्ज वैध ठरली तर तब्बल 57 अर्ज विविध कारणांनी अवैध ठरली.  मात्र, त्यानंतर 17 अपक्ष आणि पक्षाच्या उमेदवारांनी भरलेला डमी अर्जाचा समावेश आहे. त्यामुळे आता 93 अर्ज दाखल आहेत. मात्र, सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक आणि राज्यस्तरीय नेत्यांनी दिवाळी, शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या लाभ घेत अपक्ष उमेदवारांसोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेत ‘नफा – तोट्याचे‘ गणित जुळवले आहेत. यात ते किती यशस्वी झाले आहेत, हे किती उमेदवार अर्ज माघार घेतात, त्यावरुन स्पष्ट होईल. त्यानंतर भोकर विधानसभा मतदार संघात किती EVM लागणार हे स्पष्ट होणार आहे. (Election Commission’s focus on Bhokar Vidhan Sabha Constituency)

 

 

How To Lock-Unlock Aadhaar Card Process In Marathi।आधार कार्ड लॉक-अनलॉक कसे कराल ? पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

 

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक १६७ जणांनी भोकर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती.  या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण (Srijaya Chavan, daughter of former Chief Minister Ashok Chavan) निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे या मतदार संघात अपक्ष उमेदवारांची संख्या अचानक वाढल्याची चर्चा होत आहे. (Election Commission’s focus on Bhokar Vidhan Sabha Constituency)

 

 

 

 

 

 

लोहा आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार वरिष्ठ नेत्यांना आपल्यासाठी सभा, बैठका घेण्याचा आग्रह धरत आहेत. त्याचबरोबर आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वकियांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी कशा पद्धतीने मागे घेता येईल, यासाठीचे गणित बांधले जात असून, त्यासाठी बंडखोरांच्या गॉडफादरपर्यंत अधिकृत उमेदवार अन् त्यांचे निकटवर्तीय तन, मन, धनाने संपर्क साधत आहेत, यात ते किती यशस्वी झाले आहेत, हे स्पष्ट होईल. अपक्षांपैकी कोण माघारी घेणार अन् कोण प्रत्यक्षात मैदानात राहणार? यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.

 

 

 

नांदेड विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज 31 तारखेला एकूण नव विधानसभा क्षेत्रापैकी तीन विधानसभा क्षेत्रातून २१ अर्ज मागे घेण्यात आले. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये एकापेक्षा अधिक अर्ज दाखल करणारे उमेदवार तसेच अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे.

अर्ज माघे घेतलेले उमेदवार

85-भोकर : अमिता अशोकराव चव्हाण-अपक्ष, अलताफ अहेमद इक्बाल अहेमद -अपक्ष, अशफाक अहमद गुलाम हबीब-अपक्ष, आनंदा नागन नागलवाड-अपक्ष, उषाताई आकाश भालेराव-अपक्ष, खान अलायार-अपक्ष, चंद्रप्रकाश तुळशीराम सांगवीकर-अपक्ष, जुल्फे खान जिलानी सय्यद-अपक्ष, तुकाराम गणपत बिराजदार-अपक्ष, प्रमोद किशनराव कामठेकर-अपक्ष, बालाजी कुलकर्णी-अपक्ष, ॲड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील-अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड-अपक्ष, वैशाली मारोतराव हुक्के पाटील-अपक्ष, शिवशंकर बालाजी बडवणे-अपक्ष, सलीम अहमद अब्दुल कादर-अपक्ष, संजय शंकरराव घोरपडे-अपक्ष या 17 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली.

89-नायगाव : प्रतिक्षा भगवानराव मनूरकर-अपक्ष, प्रभावती भगवानराव मनूरकर-अपक्ष या 2 उमेदवारांनी आज आपली उमेदवारी मागे घेतली.

88-लोहा : प्रतापराव गोविंदराव पाटील-अपक्ष, श्यामसुंदर दगडोजी शिंदे-अपक्ष या 2 उमेदवारांनी आज 31 ऑक्टोबर रोजी आपली उमेदवारी मागे घेतली.

 

Local ad 1