मोठी बातमी । निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

नवी दिल्ला ः केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामुळे देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता फोल ठरणार की,  काय हे पहावे लागेल. (Big news । The Election Commission will make a big announcement)

 

 

 

 

   केंद्रीय निवडणूक आयोग आज शनिवारी दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Election 2022), उत्तराखंड (Uttarakhand), मणिपूर (Manipur), गोवा (Goa) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असा अंदाज आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपणार आहे. तर, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च 2022 पर्यंत संपणार आहे. (Big news । The Election Commission will make a big announcement)

 

बुल्लीबाई अ‍ॅप । केंद्र सरकार मूग गिळून बसलंय का? : अ‍ॅड. आस्मा शेख

 

दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचं संकट असताना निवडणूक जाहीर करताना काळजी घ्यावी लागणार आहे.  कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन होणार का, हे पाहावं लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असताना होणारी गर्दी, प्रचारसभा या संदर्भात निवडणूक आयोग कठोर नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. (Big news । The Election Commission will make a big announcement)

Local ad 1