Exit Polls । एक्झिट पोल संदर्भात निवडणूक आयोगाचा आला महत्वाचा आदेश
Exit Polls । पुणे : जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु असून, येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणूक संदर्भातील एक्झिट पोल (Exit Polls) विषयी राज्य निवडणूक विभागाने आदेश दिला आहे. (An important order came from the Election Commission regarding exit polls)
भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा तसेच देशाच्या इतर राज्यातील काही ठिकाणीही निवडणूक कार्यक्रम १८ जानेवारी २०२३ रोजी जाहीर केला आहे. (An important order came from the Election Commission regarding exit polls)
येत्या १६ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सकाळी सात वाजेपासून २७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सायंकाळी सात वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस मुद्रीत अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यम किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे एक्झिट पोल (Exit Polls) आयोजित करण्यास, प्रकाशित करण्यास आणि प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या कलम १२६ (१) (ब) अन्वये असे करण्यास प्रतिबंध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (An important order came from the Election Commission regarding exit polls)