अँड अविनाश भोसीकर यांचा चिखलभोसी येथे सत्कार
कंधार : तालुक्यातील चिखलभोसी येथे बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अॅड.अविनाश भोसीकर (Adv. Avinash Bhosikar, Founder President of Basav Brigade) यांची राष्ट्रीय बसव दल अखिल भारतीय लिंगायत संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. (Elected President of Rashtriya Basav Dal All India Lingayat Association)
अविनाश भोसीकर (Adv. Avinash Bhosikar) यांनी वयाच्या १९ व्या वर्षी विद्यार्थी दशेपासूनच चळवळीच्या माध्यतून सामाजिक क्षेत्रात काम सुरुवात केली आहे. सुरवातीला स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया (Student Federation of India) या विद्यार्थी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अनेक वर्षे काम केलं. त्यानंतर २००६ साली बसव ब्रिगेड या लिंगायत संघटनेची स्थापना (Establishment of Lingayat organization called Basav Brigade) करुन लिंगायत समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची चळवळ सुरु केली. २०१३ साली देशातील सर्व लिंगायत संघटनांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणून लिंगायत समन्वय समितीची स्थापना (Establishment of Lingayat Coordinating Committee) केली. त्यातून गायत स्वतंत्र धर्माचा लढा आणखी तीव्र केला आहे. नुकतीच त्याची राष्ट्रीय बसव दल संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. (Elected President of Rashtriya Basav Dal All India Lingayat Association)
आंतराष्ट्रीय स्तरावर काम करणारी ही संघटना, महात्मा बसवण्णांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हे ध्येय उराशी बाळगून दिवसरात्र काम करत आहे. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ते नव्वदीच्या घरात वय असणारे सदस्य, त्यांची महात्मा बसवण्णांविषयी असलेली असीम निष्ठा आणि कट्टरता याविषयी ओळखले जातात. विशेषतः दक्षिण राज्यांमध्ये या संघटनेचा प्रसार आहे. (Elected President of Rashtriya Basav Dal All India Lingayat Association)
यावेळी गावकऱ्यांनी अविनाश भोसीकर यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तरुणांनी अविनाश भोसीकर यांच्या कुशल नेत्रत्वाखाली बसव ब्रिगेड या परिवर्तनवादी संघटनेमध्ये सामील होण्याचे आवाहन सचिन पेठकर यांनी केले. (Elected President of Rashtriya Basav Dal All India Lingayat Association)
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, भाजपचे कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनंदाताई भोसीकर, काँग्रेसचे कंधार शहर सरचिटणीस अजय मोरे, मंगनाळीचे सरपंच प्रतिनिधी पिंटू अभंगे, शिवम पाटील, संदीप कल्याणकस्तुरे,सतिश कल्याणकस्तुरे,अनिल वंजे,माधव स्वामी ,मारोती भुजबळ,श्रीभाऊ ताटे, मन्मथ किडे, भीमा केशे, माजी सरपंच नारायण किसनराव वरपडे, माजी उपसरपंच इरबा कांबळे, उपसरपंच अमोल सोनकांबळे, माजी सरपंच भगवान वरपडे, शहीद भगतसिंग मित्र मंडळाचे अध्यक्ष मुंजाजी किडे, मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक दयानंद किडे, मार्गदर्शक वसंतराव किडे, पद्माकर किडे, बसव ब्रिगेड शाखा अध्यक्ष विजय जयराम केसे, शाखा उपाध्यक्ष किशन निळेगावे, जीवन वरपडे, माधव कांबळे, सिकंदर शेख, रणवीर सोनकांबळे, पवन कांबळे, संदीप आसेगावे, नामदेव कांबळे, सुनील कानगुले, पांडुरंग सोनकांबळे व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (Elected President of Rashtriya Basav Dal All India Lingayat Association)