मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एकनाथ पवार यांनी दिला भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा

पिंपरी : मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या (BJP) प्रदेश प्रवक्ते आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत ज्येष्ठ नेते एकनाथ पवार यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला आहे. (Eknath Pawar resigned from all posts of BJP)

 

पिंपरी येथे रविवारी (दि.22) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar) या दोन मातब्बर मराठा नेत्यांवर निशाणा साधला. (Eknath Pawar resigned from all posts of BJP)
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे नेते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून तमाशा बघण्याची भूमिका घेत आहेत. आपले न्याय हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांना कदापि माफ करणार नाही.
महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना मी सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता राजीनामा देत आहे. माझी राजकीय भूमिका मी 27 तारखेला पुन्हा जाहीर करेल. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी पिंपरी -चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड शहर बंद असताना झालेल्या सभेत मी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच वेळी मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेईल असे जाहीर केले होते.
मागील काळात भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना माझ्यावर विविध आंदोलनाचे किमान 100 गुन्हे दाखल झाले आहेत. मी सामान्य शेतकरी कुटुंबातून शहरात नोकरी निमित्त आलो. पक्षाने मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली तसेच 2014 मध्ये विधानसभा लढण्याची देखील मला संधी मिळाली. पक्षाच्या विविध प्रदेशाध्यक्षांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो.
Local ad 1