आरोग्य विभाग भरती ; साडे आठ लाख विद्यार्थ्यी देणार परिक्षा

पुणे MH News : आरोग्य विभागातील गट क व ड संवर्गाच्या लेखी परिक्षेचे नियोजन सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर 25 सप्टेंबर रोजी गट क संवर्गाची दोन सत्रामध्ये आणि 26 सप्टेंबर रोजी गट ड संवर्गाची एका सत्रामध्ये लेखी परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. (The exam will be held on September 25 and 26) या दोन्ही गटासाठी राज्यातून तब्बल आठ लाख 66 हजार 660 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. (Eight and a half lakh students applied for group C and D in the health department) 

 

 

लेखी परिक्षेच्या नियोजनाच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी सुरु केला असून, त्यासंदर्भात राज्यातील प्रमुख अधिकार्‍यांची नुकतीच बैठक झाली. त्यात तयारी संदर्भात आढावा घेण्यात आला. 25 व 26 सप्टेंबर रोजीच्या लेखी परिक्षेसंदर्भात बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका व ओएमआर उत्तरपत्रिका जतन करणेसंबंधी कोषागार कार्यालयाकडील स्ट्रॉग रुम अथवा विभागाकडील सुरक्षा खोली व्यवस्था, जिल्हानिहाय नोडल अधिकारी यांचे परिक्षा केंद्रनिहाय पर्यवेक्षण याविषयी नियोजन करण्यात आले.

 

 

राज्यातून आरोग्य विभागातील पदांसाठी उमेदवारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार लेखी परिक्षेकरिता गट – क संवर्गाचे एकूण 4 लाख 5 हजार 163 व गट ड संवर्गाचे 4 लाख 61 हजार 497 असे एकूण 8 लाख 66 हजार 660 उमेदवर परिक्षेस बसणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचंड स्पर्धा असणार आहे. (Eight and a half lakh students applied for group C and D in the health department) 

Local ad 1