...

Eid-ul-Fitr 2025। रमजान ईद सोमवारी साजरी केली जाणार

Eid-ul-Fitr 2025। पुणे. रमजान ईद (ईद-उल-फितर) हा मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. ईद-उल-फितरची (रमजान ईद) तारीख कॅलेंडरनुसार ठरविली जात नाही, परंतु चंद्र पाहिल्यानंतर ईदची तारीख निश्चित केली जाते. रविवारी चंद्र दर्शन झाले असून, सोमवारी ईद सादरी केली जाणार आहे, अशी माहिती पुणे शहर हिलाल कमिटीने दिली आहे. (Eid-ul-Fitr 2025 will be celebrated on Monday)

 

महापालिकेच्या डांबर खरेदी निविदेला स्थगिती देण्याची मागणी

रविवारी चंद्र दर्शन झाले असून,  मगरीब नामाज नंतर हिलाल कमिटी (चांद समिती) ची बैठक झाली. त्यावेळी मौलाना गुलाम अहमद कादरी, हाफीज जावेद,हाफीज एजाज, मौलाना जमीरुद्दीन णि हाफिज माजिद उपस्थित होते. रविवारी या बैठकीत रमजान ईद साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ईदची नमाज शहरातील 141 मशिदींमध्ये अदा केली जाईल. ईदची नमाज गोळीबार मैदान इदगाह येथे होणार आहे.

 

 

Eid-ul-Fitr 2025 will be celebrated on Monday

मुस्लिम समुदायातील लोक सकाळी नवीन कपडे घालतात आणि मशिदी किंवा ईदगामध्ये ईद प्रार्थना करतात. यानंतर, ते एकमेकांना मिठी मारतात आणि ईदच्या शुभेच्छा देताता. ईदचा उत्सव हा बंधुत्वाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी, नामाज अदा करुन  मुस्लिम लोक अल्लाहचे आभार मानतात. या विशेष प्रसंगी, घरातील मोठी लहान मुलांना ईदी देतात.  तसेच, या दिवशी, गरजूंना अन्न दिले जाते, ते कपडे आणि आवश्यक गोष्टी देखील वितरित केले जातात.

Local ad 1