AI चा प्रशासनात प्रभावीपणे वापर ; सायबर सिक्युरिटी अवेअरनेसाठी प्रशिक्षण
तहसील कार्यालय नांदेड येथे मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. (Effective use of AI in administration)
नांदेड : तहसील कार्यालय नांदेड येथे मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. (Effective use of AI in administration)
यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी “Stay Safe Online / Cyber Hygiene” सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत Wi-Fi Security, Online Security, ATM Security, SIM Cloning, Aadhaar Payment Security, Cyber Bullying Protection यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली. तहसील कार्यालय नांदेड आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून, हा उपक्रम सरकारी कार्यालयांसाठी आदर्श ठरेल. या प्रशिक्षणास स्वप्निल दिगलवार, काशिनाथ डांगे, इंद्रजीत गरुड, रवींद्र राठोड सर्व नायब तहसीलदार, देविदास जाधव इत्यादी सह सर्व कर्मचारी हजर होते.