मुस्लिम आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये होणार आंदोलन

Muslim reservation | औरंगाबाद : मुस्लिम समाज हा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागास आहे. (Muslim society is economically, educationally, socially backward) त्यामुळे तत्कालिन आघाडी सरकारने दिलेले पाच टक्के आरक्षण न्यायालयाने कायम ठेवले. मात्र, तत्कालिन युती सरकरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण लागू केले नाही. तर सध्याच्या महाविकास आघाडी सरकरानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुस्लिम आरक्षणासह इतर मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 30 ऑगस्ट 2021 सकाळी 11 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. (An agitation will be held in Aurangabad for Muslim reservation) त्यात मुस्लिम समुदायाने मोठ्या संख्येने सहगभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद (VBA spokesperson Farooq Ahmed) यांनी केले आहे.

 

आरोग्य विभागात नोकरीसाठी अर्ज केला असेल तर परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून घ्या

 

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Ad prakash ambedkar) यांनी कठोर कायदा शासनाने बनवावा यासाठी एक मसूदा तयार केला आहे. हा मसूदा राज्य सरकारला पाठवला आहे. हा कायदा विधानमंडळात बणवावा, सारथी-बारटी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी, वक्फ बोर्डाच्या जमीनीवर झालेले अतिक्रमणे काढावेत, (wakf board land in maharashtra) त्या जागेचा फायदा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग झाला पाहीजे, अशा विविध मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

mumbai five star hotel singer story | सुरक्षा रक्षकाने गायले देशभक्तीपर गाणे आणि अवघ्या काही तासांत झाली कमाल

 

भाजपाने माफी जन यात्रा काढायला हवी

महाविकास आघाडी व भाजपा मतांचे राजकारण करुन मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला विकासापासून वंचित ठेवत आहे. भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेवर टिका करत त्यांनी सांगितले इंधन दरवाढ, गँस दरवाढ, महागाई, कोरोनाने जनता होरपळून गेली आहे. बेरोजगारी वाढली याची केंद्र सरकारला चिंता नाही. सध्याची देशाची परिस्थिती बघता भाजपाने माफी जन यात्रा काढायला हवी. मुस्लिम आरक्षणावर काँग्रेस, राष्ट्रवादी चे नेते काही बोलायला तयार नाहीत, याबद्दल अल्पसंख्याक मंत्र्यावर त्यांनी टिका केली. यावेळी वंचितचे सुनील वाकेकर, पूर्वचे शहराध्यक्ष डॉ. जमील देशमुख, पश्चिमचे शहराध्यक्ष संदीप सिरसाट, सलिम पटेल, खालेद पटेल अंधारीकर, प्रो. अब्दुल समद उपस्थित होते. (Muslim society is economically, educationally, socially backward)

Local ad 1