Earthquake। भारतासह नऊ देशात भूकंपाचे धक्के….
भारतातील अनेक राज्यातही भूकंप
Earthquake । : मंगळवारी रात्री दिल्लीसह (Delhi) आशियातील अनेक देशातील काही भागात भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. या भूकंपामुळे तब्बल 40 सेकंद जमीन हादरली. त्यामुळे लोक घारबले आणि घराबाहेर पळाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.6 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा एपिसेंटर अफगाणिस्तानच्या फैजाबाद पासून 133 किमी अंतरावर दक्षिण पूर्वेकडे होता. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत 56 किलोमीटरवर होते. (Earthquake shocks in nine countries including India)
भारतात कुठे कुठे झटके?
दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर रात्री हिमाचल प्रदेशातही 12 वाजून 51 मिनिटाने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवली गेली. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, श्रीनगर, शिमला, मंडी, देहरादून, उत्तरकाशी, चमोली, मसूरी, अमृतसर, मोगा, भठिंडा, मानसा, पठानकोट, जालंधर, गुरदासपूर, होशियारपूर, मुरादाबाद, सहारनपुर, शामली, लखनऊ आदी ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. 30 सेकंदापर्यंत जमीन हादरली होती.