E-Peek-Pahani । एक दिवसात दोन लाखांहून अधिक पीक पेरा नोंदीचे उद्दिष्ट ; शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींच काय?

E-Peek-Pahani नांदेड Nanded News : मराठवाडा दिनानिमित्त जिल्ह्यात 75 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परंतु नियोजनाचा अभाव असल्याने उद्दीष्टपूर्ती झालेली नाही. असे असताना आता आता जिल्हा प्रशासनाने (Nanded District Administration) एका दिवसात दोन लाखांहून अधिक ई पीक पाहणी (पिक पेरा नोंदणी) (Pickpera registration) करण्याची एकदिवसीय मोहिमेची घोषणा केली आहे. जे एक महिन्यात होऊ शलके नाही, ते काम एका दिवसात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एका हे उद्दिष्ट साध्य होईल का, हे पाहणे महत्वाचे आहे. तर दुसरीकडे नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीचं काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. (One-day crop inspection registration campaign in Nanded district)

 

राज्यात 15 ऑगस्ट पासून “ई-पीक पाहणी प्रकल्प (E-Crop Survey Registration Project) राबविण्याचा येत असून, सदर प्रकल्पात पीक पेरणीची माहिती स्वतः शेतक-यांनी मोबाईल अॅपव्दारे गाव.न.नं.१२ मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज नाही, अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यांनी कशा पद्धतीने पिकपेरा नोंद करावी , असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी, पूर, करोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे आणि “ई-पीक पाहणी” (E-Peek-Pahani)  मोबाईल अॅपचा (Mobile app) थोडा उशिरा शुभारंभ ह्याचा विचार करून खरप हंगामाची पीक पाहणी नोंदविण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात मागील एक महिन्यात एक लाख शेतक-यानी अॅप डाऊनलोड करून नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित सर्व शेतक-यांनी “ई-पीक पाहणी” मोबाईल अपव्दारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी मंगळवारी जिल्ह्यात उर्वरित असलेले दोन लाख 10 हजार 921 शेतकऱ्यांनी एका दिवसात नोंदणी करावी, यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी केले आहे.

 

प्रत्येक गावात 200 नोंदणी करण्याचे उद्दिष्ट

उद्दिष्ट साध्य करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोविण्यात येत आहे. उपविभागीय अधिकारी यांनी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करून सदर मोहिम यशस्वी करावयाची करण्याची सूचना दिली आहे. जिल्ह्यात एकूण १५५६ गावे ऑनलाईन असून, प्रत्येक गावातील किमान २०० शेतक-यांची नोंदणी पूर्ण करावयाची आहे. (E-Peek-Pahani) 

 

प्रशिक्षणाचा अभाव

पीक पाहणी अॅप सुरळीत चालत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. या अॅप्समध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांना नेटवर्कची समस्या, सर्व्हर डाऊन, तसेच अनेक शेतकऱ्यांना मोबाईलच हाताळता येत नाही, अशावेळी नोंदणी कशी करायचो, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. ‘ई पीक’ पाणी अॅप्समध्ये पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकरा ज्या व्यक्तीस मोबाईल हाताळता येतो त्याच्याकडे चकरा मारावे लागत असल्याचे गग्रामीण भागात चित्र आहे.

Local ad 1