...

E- KYC Mandatory for Ration Card। रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; KYC करा अन्यथा धान्य मिळणे होईल बंद

E- KYC Mandatory for Ration Card : ई-केवायसी पूर्ण न केल्यास तुमचे नाव रेशन कार्डमधून काढले जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणे रेशन कार्ड (Aadhaar Card, PAN Card, Ration Card) हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. या रेशन कार्डचे तीन प्रकार आहे, त्यात पांढरे, केशरी आणि पिवळे. यापैकी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य दिले जात आहे. धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने केवायसीची महत्वाचा नविन निर्णय घेतला आहे.

 

स्वस्त धान्य दुकानदारांचे बंद आंदोलन तूर्त स्थगित, दिवाळीत खुली असणार दुकाने

 

सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणे बंद होईल. अनेक गरजू लोकांपर्यंत हे धान्य पोहोचावे आणि गैरवापर रोखता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकांना आता ३१ जिसेंबर २०२४ पर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच दोन महिन्यांच्या या कालावधीत तुम्ही केवायसी पूर् करुन घेऊ शकता.

 

 

रेशन कार्डची ई- केवायसी पद्धत समजून घ्या

रेशनकार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा. रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथला दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर (POS Machine) ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल. मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. अशाप्रकारे तुम्ही दुकानात जाऊन केवायसी अपडेट करु शकता.

 

ई-केवायसी झालेली आहे की नाही, असे तपासे

मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये जा आणि मेरा राशन नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करा. अ‍ॅप चालू होतात तुम्हाला स्क्रीनवर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल. यापैकी तुम्ही आधार किंवा रेशन कार्ड दोघांपैकी एकाचा क्रमांक टाकून सबमीट बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधार सीडिंग ऑप्शनवर या. आता तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावासमोर आधार सीडिंग YES किंवा NO असं ऑप्शन दिसेल. ज्या सदस्याच्या नावासमोर YES हा ऑप्शन असेल तर त्या सदस्यासा केवायसीची गरज नाही, पण NO असल्यास त्या सदस्याला केवायसी करणे गरजेचे आहे. पण ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

 

Local ad 1