ओमायक्रोनचा स्फोट ; राज्यात दिवसभरात आढळले 85 ओमायक्रोनचे रूग्ण
MH टाईम्स वृत्तसेवा : राज्यात बुधवारी ओमिक्रॉन विषाणुचा विस्फोट झाला असून, दिवसभरात तब्बल 85 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 3 हजार 900 नवे कोरोनाबाधित रूग्णांचीही वाढ झली आहे. बुधवारी वाढलेली रुग्णसंख्या ही गेल्या काही दिवसांतील सर्वांधिक आहे. रूग्ण संख्या वाढू लागल्याने राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Explosion of omecron; During the day in the state found 85 omicron patients)
राज्यात गेली काही महिने कोरोना रूग्णांची संख्या कमी होत होती मात्र सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात एकुण 1 हजार 306 रूग्ण बरे होऊन घरी परतले, राज्यात 65 लाख 06 हजार 137 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. बुधवारी दिवसभरात एकुण 3 हजार 900 नव्या कोरोनाबाधित रूग्णांचं राज्यात निदान झालं आहे. (Explosion of omecron; During the day in the state found 85 omicron patients)
श्री खंडोबा माळेगाव यात्रा शांततेत पारपाडण्यासाठी पोलिसांनी घेतला “हा” निर्णय
राज्यात बुधवारी 20 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात बुधवार अखेर 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Explosion of omecron; During the day in the state found 85 omicron patients)
राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. राज्यात बुधवारी ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे. राज्यात तब्बल 85 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 47 रूग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात तर 38 रूग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) अहवालात पाॅझिटिव्ह आढळून आहेत.
धक्कादायक : नांदेडमध्ये ओमीक्राॕनचा शिरकाव
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात आढळून आलेल्या 47 रुग्णांमध्ये मुंबई 34, नागपुर 03, पिंपरी-चिंचवड 03, नवी मुंबई 02, पुणे मनपा 02, पनवेल 01, कोल्हापूर 01, बुलढाणा 01 यांचा समावेश आहे. यातील 43 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर चौघे जण निकट सहवासित आहेत. (Explosion of omecron; During the day in the state found 85 omicron patients)
Big breaking news : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह