पुण्यातील ३१ चौकात अवजड वाहनांना बंदी ; कोणती आहेत चौक जाणून घ्या 

पुणे : संततधार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहरात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख ३१ चौकातून जड वाहनांना महणजेच डंपर, ट्रक, आर.एम.सी. मिक्सर सारख्या जड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. हे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार (Rohidas Pawar, Deputy Commissioner of Pune City Pune City troffic Branch) यांनी दिले आहेत. (Dumper, truck, RMC mixer vehicles banned in 31 Chowk in Pune)

 

 

 

पुणे शहरातील सर्व वाहतुक विभागातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमीत करत आहे. सदर ठिकाणी यापर्वीचे आदेश रद्द करण्यात येत आहे.

 

 

 

 

पुणे शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत तसेच पावसाचे पाणी साचुन राहिल्यामुळे रस्त्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील जड वाहनामुळे देखील रस्त्याची वहन क्षमता कमी होवुन वाहतुक कोंडी त्याचप्रमाणे नागरीकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण झाली आहे. वाहतुक सुरळीत व सुरक्षीत राहण्याकरीता पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दी मधील खालील चौकामधुन पुढील रस्त्यांवर दि. १२/०८/२०२४ रोजी पर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळुन इतर सर्व प्रकारच्या जड वाहनांना (डंपर, ट्रक, आर.एम.सी. मिक्सर व इतर) पुणे शहरामध्ये सकाळी ०९.०० वा. ते २२.०० वा. दरम्यान प्रवेश बंद राहील, असे कळवले आहे.

 

 

सकाळी ९ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद असलेले चौक

१. संचेती चौक जंगली महाराज रोडकडे, गणेशखिंड रोडकडे, कोर्ट रोडकडे

२. पौड फाटा चौक कर्वे रोड, डेक्कनकडे, लॉ कॉलेज रोडकडे

३. राजाराम पल डी.पी. रोडकडे

४. दांडेकर पुल शास्त्री रोडकडे

५. निलायम ब्रिज ना.सी. फडके चौकाकडे

६. सावरकर पुतळा चौक बाजीराव रोडकडे

७. लक्ष्मी नारायण सिनेमा चौक जेधे चौकाकडे

८. सेव्हन लव चौक जेधे चौकाकडे

९. पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रोडकडे

१०. खाणे मारूती चौक इस्ट स्ट्रीटकडे

११. पॉवर हाऊस चौक मालधक्का चौकाकडे

१२. आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे

१३ . पाटील इस्टेट चौक आर.टी.ओ. चौकाकडे.

१४) ब्रेमेन चौक : पुणे विद्यापीठ चौकाकडे

१५) शास्त्री नगर गुंजन चौकाकडे

१६. आंबेडकर चौक सदलबाबा चौकाकडे

१७. चंद्रमा चौक सादलबाबा चौकाकडे

१८. मुंढवा चौक ताडीगुत्ता चौकाकडे

१९. नोवल चौक भैरोबानाला चौकाकडे

२०. लुल्लानगर भैरोबानाला चौकाकडे

२१. लुल्लानगर गोळीबार मैदान चौकाकडे

२२. लुल्लानगर गंगाधाम चौकाकडे

२३. पुष्पमंगल चौक ते जेधे चौककडे

२४. राजस सोसायटी महेश सोसायटी चौकाकड

२५. पोल्ट्री चौक आरटीओ चौकाकडे

२६. उंड्री एनआयबीएम कडे

२७. पिसोळी हडपसर कडे

२८. हांडेवाडी हडपसर कडे

२९. अभिमानश्री चौक, पाषाण रोड

३०. अभिमानश्री चौक, बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे

३१) पुणे विद्यापीठ चौकाकडे

 

 

 

Local ad 1