Dry day | गणेश चतुर्थी निमित्त 31 ऑगस्ट रोजी ड्राय डे

नांदेड : जिल्ह्यात बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश चतुर्थी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे 9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात श्री गणेश विसर्जन मिरवणूका होवून विसर्जनाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. (Dry day on 31st August on the occasion of Ganesh Chaturthi)

 

 

उत्सव कालावधीत सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी नांदेड जिल्ह्यातील दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. (Dry day on 31st August on the occasion of Ganesh Chaturthi)

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी बुधवार 31 ऑगस्ट 2022 रोजी श्री गणेश स्थापने निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बिआर-2 व टिडी-1 अनुज्ञप्तीधारकांना अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे. (Dry day on 31st August on the occasion of Ganesh Chaturthi)

 

Local ad 1