Drought news । राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या दुष्काळाची पहाणी करण्यासाठी केंद्र शासनाचा (Central Govt) पथक राज्यात दाखल झाला असून, थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहे. (The Center has filed a petition to see the situation in the state)
मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) पुणे आणि सोलापूर जिह्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात आढावा घेण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तालयात सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार बैठकीत आढावा घेऊन बुधवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे जिह्यातील बारामती आणि पुरंदर (Baramati, Purandar) तालुक्यांमध्ये प्रत्यक्षात बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.
राज्यातील 15 जिह्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जमीन महसूलात सूट, पीक कर्जाची संधी, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, आवश्यक तेथे टँकरचा वापर यांसारख्या अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विभागाच्या केंद्रीय सचिव प्रिया रंजन यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाचे सदस्य आणि केंद्रातील विविध विभागांतील प्रमुख अधिकार्यांचे पथक स्थापन केले आहे.
त्यानुसार पथकातील काही सदस्य नागपूर, अमरावती (Nagpur, Amravati) विभागाची पाहणी करणार असून दुष्काळी पथकातील अध्यक्ष प्रिया रंजन आणि काही सदस्य आज पुणे आणि सोलापूर जिह्यातील दुष्काळाचा आढावा घेणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांपैकी पुरंदर आणि बारामती तालुक्यांत गंभीर आणि शिरूर, इंदापूर व दौंड तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे, तर सोलापूर जिह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, बार्शी (Solapur, Madha, Malshiras, Karmala, Sangola, Barshi) या पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला करण्यात आला आहे.