१२ वी परिक्षा कॉपी मुक्ती होण्यासाठी ड्रोनचा वापर होणार
राज्यातील 818 परीक्षा केंद्रावर केंद्र प्रमुख व पर्वक्षक बदलले
पुणे. मागील पाच परीक्षांमध्ये कॉपीचा गैरप्रकार उघडकीसआलेल्या राज्यातील 818 परिक्षा केंद्रांमधील केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख, पर्यवेक्षकांसह (Center Head, Co-Center Head, Supervisor) परीक्षेशी संबंधित कामकाज करणाऱ्या शिक्षकांसह इतरांची अदलाबदल करण्यात आली आहे.त्यांच्या ठिकाणी इतरांची नियुक्ती करण्यात आली आली आहे. यंदा परिक्षेत कॉपी करतानाकोणी आढळल्यास पर्यवेक्षकाला जबाबदार धरुन त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. तसेचत्या केंद्राची मान्यता कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. (Drones to be used to make 12th exam copying free)
पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीय कृती समिती लढा उभारणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणमंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षांना ११ फेब्रुवारीपासून सुरुवातहोणार आहे. या परीक्षेसाठीची संपर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शालेय शिक्षण विभागानेकॉपीमुक्त परीक्षेसाठी ज्या शाळेतील विद्यार्थी केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्याठिकाणी संबंधित शाळेतील कोणताही व्यक्तीपरीक्षेसाठी थांबणार नाही, अशा पद्धतीचा निर्णयघेतला होता. मात्र, राज्यभरातून त्याला विरोधहोऊ लागल्यामुळे शिक्षण विभागाने मागील पाच परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर किमानएक गैरप्रकार झालेला असेल तर त्याठिकाणच्या शिक्षकांच्या अदलाबदलीचा निर्णय जाहीरकेला. त्यानुसार राज्यातील नऊ विभागातील 818 केंद्रांवर त्याच शाळेतील शिक्षकपरीक्षेशी संबंधित कामकाजासाठी असणार नाहीत, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले.
केंद्र संचालकांना दिलेल्या सूचना गैरमार्गाचे प्रकरण आढळल्यास पुढील वर्षीपासून केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार. खासगी क्लासेस व इतर कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षकम्हणून नेमणूक करण्यात येऊ नये. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार करावी. केंद्रात विद्यार्थ्यांना तपासूनच सोडावे. त्यांच्याकडील असलेले साहित्य इमारतीबाहेरच काढून घ्यावे. केंद्रात फक्तकेंद्र संचालक व सहाय्यक परिरक्षक यांचाच मोबाईल सुरू राहील. उर्वरित सर्वांचे मोबाईल बंद असतील. केंद्रावर गैरप्रकार घडल्यास केंद्र संचालकांना तात्काळ माध्यमिक शिक्षणाधिकारी व मंडळाला कळवावे. विद्यार्थी, जमिनीवर, मंडपात, एका बाकावर दोनबसणार नाहीत, याची काळजी घ्यावी.