(Dr.Vipin Itankar Nanded Collector) बेड अडवून ठेवणाऱ्या रुग्णांना जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता

नांदेड : शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे बेडची तुटवडा असल्याचे मॅसेज फिरत आहेत. त्याची खतरजामा करण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी थेट शासकीय रुग्णालय गाठून बेडची प्रत्यक्ष पहणी केली. यावेळी धक्कादाय बाब समोर आली असून, आवश्यकता नसलेल्या रुग्णांनी बेड अडवून ठेवले होते. अशा 10 ते 12 रुग्णांना घरचा रस्ता दाखविला आहे. यामुळे रुग्णालय परिसरात एकच खबळळ उडाली आहे. (Dr.Vipin Itankar Nanded Collector)

गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दररोज एक हजरांपेक्षा अधिक होत आहे. त्यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत, किंवा सोम्य अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना घरीच विगलीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण ज्यांना जोखिम आहे, त्यांना वेळेत उपाचर मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. (Dr.Vipin Itankar Nanded Collector)

Dr.Vipin Itankar Nanded Collector
covid hospital

नांदेडमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत, असे मॅसेज सोशल मिडियावर फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डाॅ. विपिन इटनकर यांनी थेट शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर गाटत त्यामधील बेडची पहाणी केली. त्यात धक्कादायक बाब समोर आली असून, कही लोक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून त्यांना आवश्यकता नसतानाही या रूग्णालयात एडमिट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बेड अडवून ठेवल्यास ज्यांना आवश्यकता आहे त्यांना बेड उपलब्ध होणार नाहीत. प्रत्यक्ष पाहणीमध्ये बेड अडवून ठेवलेल्या 10 ते 12 जणांना रूग्णालयातून सुटी देऊन घरी पाठवले आहे. त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार केले जाऊ शकणार आहेत, असे डाॅ. विपिन म्हणाले. (Dr.Vipin Itankar Nanded Collector)

या रूग्णालयात पुरेसे बेड आवश्यक औषधे उपलब्ध असून नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही. विशेष म्हणजे नांदेड-वाघाळा मनपाचे आयुक्त सुनील लहाने हेही येथेच उपचार घेत आहेत. “मी पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करतो की, आजार लपवू नका. सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. माञ कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करा, असे अहवान डॉ. विपीन यांनी केले आहे. (Dr.Vipin Itankar Nanded Collector)

https://www.facebook.com/102712458138580/posts/282472130162611/

Local ad 1