Deenanath Mangeshkar Hospital । अनामत रक्कम मागण्यासाठी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या डोक्यात कुठून आला ‘राहू केतू’ – डॉ. धनंजय केळकर
Deenanath Mangeshkar Hospital पुणे, गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात पहिल्यादांच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) वतीने रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर (Dr. Dhananjay Kelkar) यांनी डॉ. घैसास यांचा राजीनामा घेतल्याचे सांगत घटनेची माहिती दिली. तेव्हा केळकर म्हणाले, त्या दिवशी नेमके डॉ. घैसास यांच्या डोक्यात कोणता राहू, केतू आला आणि त्यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट लिहून चौकोन केला, हे समजले नाही. (Dr. Sushrut Ghaisas head was affected by Rahu Ketu)
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी लिहिले मनाला स्पर्श करणारे पत्र
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनजंय केळकर यांनी सोमवारी सकाळी राज्य शासनाने गठित केलेल्या चौकशी समितीचा अहवाल पोलीस व महिला आयोगाकडे सादर केल्यानंतर सोमवारी लागलीच दुपारी पत्रकार परिषद घेऊन पाच डॉक्टांनी माध्यमांशी संवाद साधला.
डॉ. सुश्रुत घैसास यांनी दिला राजीनाम
केळकर यांनी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनामा दिल्याचे सांगत त्यांनी नेमका का राजीनामा दिला याची माहिती दिली. ते म्हणाले, “या प्रकरणाच्या मध्यभागी असलेले सुश्रुत घैसास यांचा राजीनामा घेतला आहे. ते मानद प्रसुती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. ते आमच्याकडे कर्मचारी म्हणून नाही तर सल्लागार म्हणून गेली १० वर्षे आहेत. त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सुपूर्त केला. राजीनाम्याचे कारण त्यांनी गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे अत्यंत दडपणाखाली वावरत आहे. धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी टीका, सामाजिक संघर्ष आणि तणावाचे वातावरण हे सहन करण्याच्या पलिकडचे आहेत. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. इतर रुग्णांवर अन्याय आणि कुटुंबियांच्या सुरक्षेकरिता राजीनामा देत असल्याचे डॉ. सुश्रुत घैसास यांनी नमूद केले आहे. तसेच, रात्री झोप लागत नाही, असेही त्यांनी राजीनाम्यात म्हटले असल्याचे केळकर यांनी सांगितले.
“डॉ. घैसास यांच्या आत्ता असलेल्या रुग्णांची येत्या दोन ते तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था केली जाईल. तीन दिवसांत ते त्यांचं काम संपवतील. रुग्णालयात आलेल्या रुग्णाशी बोलताना संवेदनशीलता पाहिजे, रुग्णांप्रती मदतीचा भाव हवा. पण. जास्त काम असल्याने कर्मचाऱ्यांकडून तो होत नाही. त्यासाठी यापुढे ट्रेनिंग दिले जाईल. अशी माहिती डॉ. धनंजय केळकर यांनी दिली आहे. दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार झाल्यानंतर अक्षरशः पत्रकार परिषद गुंडाळली गेली.
रुग्णालयाकडून मोठ्या शस्त्रक्रियेसाठी डिपॉझिट घेतले जाते. मात्र, हे डिपॉझिट घेण्याबाबत डॉक्टरांना अधिकार नसल्याचे केळकर यांनी सांगितले. “रुग्णांना एडमिशन फॉर्म दिला जातो. यात त्यांना अंदाजपत्रक दिले जाते. हे फक्त भिसेंना नाही तर प्रत्येक रुग्णाला दिले जाते. त्यावर रुग्णांचे नाव, डॉक्टरांचे नाव, तसेच शस्त्रक्रिया करणार आहेत की नाही आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा तपशील असतो. मात्र, त्यावर डिपॉझिट लिहिण्याची पद्धत नाही. मीही अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. मात्र कधीही डिपॉझिट लिहिले नाही. त्यादिवशीच कोणते राहू, केतू त्यांच्या डोक्यात आले आणि त्यांनी त्यावर दहा लाख लिहून चौकोन केला,” असे म्हणत केळकर यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट केले.