डाॅ. प्रमोद ढेंबरे यांना कोरोना योध्दा (Corona Warrior) सन्मान प्रदान

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरीब व गरजू रुग्णांच्या विवध चाचण्या अल्पदरात करुन रुग्णसेवा करणारे डाॅ. प्रमोद शिवाजीराव ढेंबरे यांचा कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. Dr. Pramod Dhembare honored as Corona Warrior 

 

डाॅ. प्रमोद शिवाजीराव ढेंबरे यांचे बी.टी.कवडे रस्त्यावर फीडेलिटी डायग्नोस्टीक सेंटर https://www.fidelitydiagnostics.com/ आहे. त्यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत केलेली रुग्ण सेवा कौतुकास्पद आहे. कर्तव्य फाउंडेशनतर्फे कोरोना योध्दा सन्मानाने डाॅ.बंटी धर्मा यांच्या हस्ते त्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, कार्याध्यक्ष अशोक देशमुख व रवी पवार उपस्थित होते.

 

डाॅ. ढेंबरे यांनी कोरोना संसर्ग काळात आपल्या फीडेलिटी डायग्नोस्टीक सेंटरच्या (Fidelity Diagnostics) माध्यमातून असंख्य गरीब व गरजू रूग्णांची अल्पदरात एच.आर.सीटी स्कॅनची चाचणी केली होती. तसेच त्यांनी डायग्नोस्टीक सेटंरच्या वापरासाठी कोरोना काळात अत्याधुनिक साॅफ्टवेअरची निर्मितीही केली आहे. डाॅक्टर ढेंबरे यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आहे, असे विकास भांबुरे यांनी सांगितले. Dr. Pramod Dhembare honored as Corona Warrior

Local ad 1