...

यशदातीलअधिकारी डॉ. जोगदंड यांच्या पदव्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद

महाराष्ट्रात अधिकारी वर्गात सर्वाधिक पदव्यांचे मानकरी

पुणे :  यशदा,पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी आतापर्यंत मिळवलेल्या सर्वाधिक २५ पदवी,  पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेऊन त्यांची प्रशंसा केली  आहे. (The officer in Yashada, Dr. Jogdand’s degree is recorded in the India Book of Records)  महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यरत अधिकारी वर्गात कदाचित  सर्वाधिक पदव्या घेतल्याची नोंद  त्यांच्याच नावावर होऊ शकेल, एवढ्या त्यांच्या पदव्या आहेत.

गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसच्या (Guinness Book of Records) धर्तीवर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विक्रम करणाऱ्यांची नोंद भारतामध्ये  इंडिया  बुक रेकॉर्डसमध्ये घेतली जाते.हे बुक एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या सर्व मार्गदर्शक प्रणालीचा अवलंब करते. इंडिया बुकऑफ रेकॉर्डमध्ये विविध क्षेत्रात विक्रम करणाऱ्या अनेकांची  आतापर्यंत नोंद झाली आहे. त्यात डॉ.जोगदंड यांच्या शिक्षणाची नोंद झाली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात NCB ची धमाकेदार कामगिरी ; तब्बल 11 कोटींचा गांजा जप्त

डॉ.जोगदंड यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन  शिक्षण  घेतले.पुढे  पंधरा विषयांमध्ये पदव्या व दहा विषयांमध्ये डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. (He has completed degree courses in fifteen subjects and diploma and certificate courses in ten subjects.) असे एकूण २५ अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांची या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल  घेऊन या त्यांच्या  विक्रमाची नोंद घेतली आहे.नुकतेच याबाबत त्यांना प्रशंसा पत्र सुद्धा पाठवण्यात आले असून यामध्ये त्यांनी घेतलेल्या विविध पदव्यांचा अंतर्भाव केला आहे. (The officer in Yashada, Dr. Jogdand’s degree is recorded in the India Book of Records)

 

डॉ. जोगदंड यांनी तब्बल सहा विषयात एम. ए. केले असून  एम. बी. ए.  एल. एल. बी.या महत्वपूर्ण  पदव्यासह पत्रकारितेत पीएचडी केली आहे.व आता दुसरी डॉक्टरेट ते लोकप्रशासन या विषयात करत आहेत.इतर अन्य   अशा एकूण २५  डिग्री, डिप्लोमा, प्रमाणपत्र त्यांनी मिळविली आहेत. सध्या राज्य शासनामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍यांमध्ये कदाचित सर्वाधिक पदव्या व प्रमाणपत्र अभ्यासक्रम मिळविण्याचा मान  त्यांच्याच नावावर नोंदविला जाऊ  शकतो.

डॉ.जोगदंड यांनी नांदेड जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम अशा खेडेगावातून  येऊन विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्याने अनेक वर्ष पत्रकारितेत काम केले असून प्रशासकीय, शैक्षणिक, पर्यावरण विषयक क्षेत्रातही त्यांचे भरीव  योगदान आहे.या  कामाची दखल घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण व शिक्षण मित्र पुरस्कार देऊन नुकतेच राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. त्यांनी  शैक्षणिक क्षेत्रातही भरीव काम केले आहे. त्यांनी अनेकांना शैक्षणिक,स्पर्धा परीक्षाविषयक करियर कौन्सिलविषयक मार्गदर्शन केले आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित असून, त्यांची राज्यभर विविध ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत. त्यांचा प्रचंड जनसंपर्क असून त्यांच्या या जनसंपर्कावर आधारित ‘ द किंग ऑफ ह्युमन नेटवर्किंग’ असा ग्रंथही प्रकाशित झाला आहे. ते अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम या संघटनेचे सहसचिव असून हे शासनाच्या डॉ.बाबासाहेबआंबेडकर चरित्र, प्रकाशन साधने समितीचे सदस्य सुद्धा आहेत.

अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रम मंडळावरही  सदस्य आहेत आहेत. यशदाच्या यशमंथन या  त्रेमासिकाचे ते संपादक आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक संस्थांचे २०  हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या पदव्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  (The officer in Yashada, Dr. Jogdand’s degree is recorded in the India Book of Records)
Local ad 1