(dr.b.r.ambedkar) डॉ. आंबेडकर चरित्र प्रकाशन साधने समितीवर डॉ.जोगदंड यांची निवड

पुणे : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) yashada या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेतील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची राज्यशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन  या समितीवर सदस्य म्हणून निवड केली आहे. (dr.b.r.ambedkar)

राज्य शासनाने अध्यादेश जारी करुन या समितीचे तीन वर्षासाठी पुनर्गठन केले. या समितीच्या सदस्य सचिवपदी डॉ. कृष्णा कांबळे यांची निवड केली आहे. समितीतील अन्य सदस्यांमध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर, पत्रकार निखिल वागळे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संघटनेचे पुनर्गठन करण्याची मागणी शासनाकडे होत होती. आज शासनाने त्यासंबंधातील शासन अध्यादेश काढून या समितीचे पुनर्घटन केले. या समितीचे अध्यक्ष राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. (dr.b.r.ambedkar)

 डॉ. जोगदंड यांचा प्रकाशन व साहित्य क्षेत्रातील मोठा अनुभव असून त्यांनी पत्रकारितेमध्ये पीएचडी ही पदवी संपादन केली आहे, त्याचबरोबर यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्रामार्फत अनेक ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांची स्वतःची ७ पुस्तके प्रकाशित असून, त्यांनी आतापर्यंत तेरा विषयात पदव्या व आठ विषयांमध्ये डिप्लोमा, कोर्सेस केले आहेत, त्यापैकी सहा विषयात त्यांनी एम. ए. केले आहे. त्यांनी यापूर्वी दहा वर्षे पत्रकारितेत काम केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण व आर्थिक विचारावर त्यांचे दोन ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (dr.b.r.ambedkar)

Local ad 1