आठ लाखांची लाच घेणाऱ्या विभागीय अपर आयुक्त डाॅ. अनिल रामोडच्या घरात सापडले सहा कोटीचे घबाड

पुणे : राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात आली होती. त्याबदल्यात मिळालेला मोबदला कमी होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने वकिलामार्फत विभागीय अपर आयुक्त यांच्याकडे मोबदला वाढवून मिळावा यासाठी अर्ज केला होता. वाढीव मोबदल्याच्या दहा टक्के रक्कम द्यावी लागेल, अशी मागणी केली. तडजोडीनंतर आठ लाखांत डिल झाली. शुक्रवारी दुपारी बारा वाजता आठ लाख रुपये (Dr. Anil Ramod arrested for taking bribe of eight lakhs) स्विकारताना विभागीय अपर आयुक्त डाॅ. अनिल रामोड (Divisional Additional Commissioner Dr. Anil Ramod) यांना सीबीआयच्या (CBI) पथकाने रंगेहाथ पकडले. तसेच त्याच्या तीन ठिकाणी मारलेल्या छापेमारीमध्ये सहा कोटी रुपये रोख  (Dr. Anil Ramod arrested for taking bribe of eight lakhs) आणि 14 मलमत्ताचे कागदपत्रे सापडली आहेत, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

 

शेतकर्‍यांच्या संपादित जमिनीचे वाढील मोबदल्यावर दहा टक्के कमिशनची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने वकिलामार्फत सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार सीबीआयने गेल्या चार दिवसांपासून रामोड यांची माहिती गोळा करत होते. शुक्रवारी ठरल्यानुसार तक्रारदार वकिल आठ लाख रुपये घोऊन त्यांच्याकडे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गेला. त्यावेळी दोघांत चर्चा झाली. लाचेची रक्कम आणल्याचे खात्री झाल्यानंतर ते आपल्या अँन्टी चेंबरमध्ये जात लाच स्विकारली. त्याचवेळी बाहेर असलेल्या सीबीआयच्या पथकाने थेट दालनात प्रवेश केला. रामोड यांची सुमारे सहा तास चौकशी केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने सुमारे सहा ते सात फाईलीचे गट्टे सोबत घेऊन गेले आहेत. या फाईली कोणत्या प्रकरणातील आहेत, हे समोर आलेले नाही.

 

दरम्यान, कार्यालयात रामोडची चौकाशी सुरु असतानाच पुण्यातील दोन आणि नांदेडमध्ये एका ठिकाणी झाडाझडती सुरु होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या तिन्ही ठिकाणावरून सुमारे सहा कोटी रुपये रोख सापडले आहेत. तसेच 14 मालमत्तांचे कागदपत्रे, गुंतवणूक, तसेच बँकांची माहिती मिळाली आहे. रामोड होता रडारावर गेल्या काही दिवसांपासून रामोड याच्या कार्यपद्धीवरुन कारवाई होईल, अशी चर्चा विभागीय आय़ुक्त कार्यालयात होत होती.

 

कार्यालयातून जप्त केलेल्या फायलींचा विचार करता, गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय घेताना तडजोडी झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे रामोडने घेतलेल्या निर्णयांची आता चौकशी होईल, अशी चर्चा सुरु झाली. सीबीआयच्या पथकाने रामोड यांच्या विभागीय आयुक्तालयातील दालनात लाच घेताना अटक केली. ही बातमी वाऱ्यासारखी विभागीय आयुक्तालय आणि शहरातील इतर शासकीय कार्यालयांमध्ये पोहोचली. प्रत्येकजण दबक्या आवाजात चर्चा करत होता. तर आयुक्तालयातील अनेक अधिकारी कर्मचारी अचंबित झाले, तर काहीजण येथे काहीच घडले नाही, असे वावरत होते. अनेक कर्मचारी आपल्या दालनाच्या दरवाजातून, खिडकीतून डोकावून रामोड यांच्या दलानाकडे बघत होते.

Local ad 1