दुःखद बातमी । सुप्रसिद्ध लेखक डॉ.अनिल अवचट यांचे निधन

दुःखद बातमी । पुणे : सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुणे पत्रकारनगर येथे राहत्या घरी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.गुरुवारी सकाळी 9.15 वाजता त्यांनी आखेरचा श्वास घेतला. (Well known author Dr. Anil Avchat passed away)

 

 

 

दिवंगत पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे. डॉ.अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यासांमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील, असा दिलासा मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना दिला. (Well known author Dr. Anil Avchat passed away)

 

 

 

मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. दरम्यान, दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली. (Well known author Dr. Anil Avchat passed away)

Local ad 1