उर्दू घराचा (Urdu house) वापर शादीखाना म्हणून होणार नाही : पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेडमध्ये राज्यातील पहिल्या उर्दू घराचे उद्घाटन

नांदेड : उर्दू भाषिकांसाठी राज्यातील पहिले उर्दू घर नांदेडमध्ये साकारण्यात आले. उर्दू व इतर भाषावरील अनेक वैविध्य असलेले व्याख्याने, चर्चासत्र, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत, उर्दू घर कला, साहित्य यांचे माहेरघर झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करुन याचे रुपांतर शादीखाना किंवा अन्य कामासाठी होणार नाही,  असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. (Don’t let Urdu house become a wedding hall: Guardian Minister Ashok Chavan

 

नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या “उर्दू घर” इमारतीचे उद्घाटन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यास राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती होती. (Don’t let Urdu house become a wedding hall: Guardian Minister Ashok Chavan)

 

The event was chaired by Nawab Malik, Minister for Minority Development and Okaf, Skills Development, Employment and Entrepreneurship. Minister of State for Minority Development and Awakaf, Vishwajeet Kadam, Zilla Parishad President Mangarani Ambulgekar, Former Minister Naseem Khan, Former Minister of State D. P. Sawant, MLA Amarnath Rajurkar along with Urdu writers and Urdu lovers were present.

 

उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या “उर्दू घर” च्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा मला अधिक आनंद आहे, अशा भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. (Don’t let Urdu house become a wedding hall: Guardian Minister Ashok Chavan) 

 

Urdu house
Urdu house

 

अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेवून कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी त्यांनी नवाब मलिक यांच्याकडे केली.

 

अल्पसंख्यांकांच्या विकासाच्या योजना व “उर्दू घर” सारखे प्रकल्प हे पुढच्या पिढीसाठीही तितकेच महत्वाचे आहेत. ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्या चांगल्या स्थितीत ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासकीय पातळीवरुन यांची देखरेख जरी समितीमार्फत केली जाणार असली तरी इथे येणाऱ्या प्रत्येकाने या “उर्दू घर” कडे आपल्या घराच्या जबाबदारीने पाहून त्यात सर्वतोपरी योगदान दिले पाहिजे असे आवाहनही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले . (Don’t let Urdu house become a wedding hall: Guardian Minister Ashok Chavan) 

 

 

हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची जुबान आहे, बोली आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून “उर्दू घर”ची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले.

 

अल्पसंख्याक समाजात गरीबीमूळे न शिकता येणारा वर्ग मोठा आहे. अशा वर्गातील शिक्षणासाठी मुले जर पुढे येत असतील तर त्यांचाही प्राधान्याने विचार करु, त्यांना शिकवू असे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक वर्गातील मुलांसाठी वसतीगृहाबाबत धोरणात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.

 

उर्दू घराला दिलीप कुमार यांचे नाव द्या

मोठया कष्टातून आकारास आलेल्या या “उर्दू घर”ला अल्पसंख्याक समाजातील बांधवांनी, उर्दू साहित्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनी, साहित्यीकांनी योगदान देण्याची गरज आहे. गुणवत्तापूर्वक उपक्रमाच्या माध्यमातून ही संस्था अधिक नावारुपास येईल, असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले. नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे “उर्दू घर” असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव “उर्दू घर”ला देण्यात यावे अशी मागणी तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी केली. Name the Urdu house of Dilip Kumar

 

Local ad 1