अफवांवर विश्वास ठेवू नये नांदेडची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात : जिल्हा पोलीस अधिक्षक शेवाळे

नांदेड : त्रीपुरा येथील घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले. (The repercussions of the Tripura incident were felt in Nanded) यात ज्या समाजकंटकांनी जाणीवपूर्णक कायदा हातात घेऊन विध्वंस करण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, अशी माहिती नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे (District Superintendent of Police, Nanded, Pramod Shewale) यांनी दिली. (Don’t believe the rumors. The situation in Nanded is under complete control)

 

 

नांदेड येथील भाईचारा कोरोना काळातही अतिशय संयमाने लोकांनी जपला आहे. तो भाईचारा आणि संहिष्णूता सर्व नांदेडकर मानवी एकतेला जपतील असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला. अशा घटनांमध्ये गोरगरीब व ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागते. परस्पर सहकार्याची भावना प्राधान्याने विचारात घेऊन सर्व नागरीक पुन्हा विश्वासाने जनजीवन सुरळीत सुरू करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. (Don’t believe the rumors. The situation in Nanded is under complete control)

 

 

नांदेड येथे अतिरिक्त पोलीस दलाची टिम व सुरक्षिततेच्या सर्व यंत्रणा तत्पर दाखल झाले असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी स्पष्ट केले. (Don’t believe the rumors. The situation in Nanded is under complete control)

 

 

काय आहे प्रकरण

त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. त्यात नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आली आहे. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Local ad 1