Maratha reservation । आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? : अजित पवार 

Maratha reservation । पुणे : शिवनेरीवर शिवजयंती (shiv jayanti) सोहळ्यात मराठा आरक्षणाची मागणी काही तरुणांनी केली. दरम्यान, कार्यक्रमापुर्वीच मागणी करणाऱ्या तरुणांचे म्हणणे उपमुख्यमंत्री अजित पवार  (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी ऐकूण घेतले होते. परंतु अजित पवार भाषण करत  असताना त्या तरुणांनी आरक्षणाच्या प्रश्नावरुन प्रश्न विचारत भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या तरुणांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात खडसावले. (Do you get happiness by extending Maratha reservation: Ajit Pawar)

 

 

 

“शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचे म्हणणेही ऐकून घेतले. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?”, असा सवाल अजित पवार यांनी केला. (Do you get happiness by extending Maratha reservation: Ajit Pawar)

 

Shivaji Maharaj। ‘आझम कॅम्पस’ च्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड येथे शिवाजी महाराजांना अभिवादन

 

शिवनेरी गडावर आज शिवजयंतीचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संभाजी छत्रपती उपस्थित होते. (Do you get happiness by extending Maratha reservation: Ajit Pawar)

 

Shivaji Maharaj। ‘आझम कॅम्पस’ च्या वतीने कँटोन्मेंट बोर्ड येथे शिवाजी महाराजांना अभिवादन

 

यावेळी अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही तरुणांनी मराठा आरक्षणाचा विषयावरुन अजितदादांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते, असं अजितदादा म्हणाले. तेव्हा काही तरुणांनी त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले.  त्यावर त्यांनी भर सभेतच या तरुणांना कानपिचक्या दिल्या. (Do you get happiness by extending Maratha reservation: Ajit Pawar)

 

…तर तुम्हांला मिळणार एका लाखांचे बक्षिस !

 आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) द्यायचे आहे. आरक्षण रखडवून आम्हाला काय आनंद मिळतो का? काही कायद्याच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेतल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. आम्ही स्वत: पंतप्रधानांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारचे प्रयत्न अजूनही थांबलेले नाहीत. प्रयत्न सुरूच आहेत, असंही अजित पवारांनी (ajit pawar)  सांगितले. तसेच ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची मराठा तरुणांची मागणीही त्यांनी धुडकावून लावली. (Do you get happiness by extending Maratha reservation: Ajit Pawar)

Local ad 1