...

 तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेवू नका ; पुणे महापालिकेची 860 रुग्णालयांना नोटीस

पुणे : तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका, अशा स्वरुपाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना काढली आहे. अनामत रकमेसाठी अडवणुक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत रुग्णालयावर कारवाई करण्याचा ईशाराआरोग्य विभागाने दिला आहे. (Do not take a deposit for emergency treatment)

 

 

दहा लाखांची अनामत रक्कम भरली नाही म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार नाकारले. त्यानंतर उशिरा उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. पैशांमुळे रुग्णाचा जीव गेल्यामुळे रुग्णालयाच्या विरोधात चांगलेच वातावरण पेटले आहे. राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संघटना, संस्था तसेच पुणेकरांकडून रुग्णालयच्या विरोधात संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.

 

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व ८६० खासगी रुग्णालयांना तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कमेचा हट्ट धरू नये. अशा प्रकारची नोटीस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. निना बोराडे (PMC Health Chief Dr. Nina Borade) यांनी दिली आहे. रुग्णालांनी महापालिकेच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


या टोल फ्रि क्रमांकावर करा तक्रार

रुग्णालयांनी अनामत रक्कम भरण्याची सक्ती केल्यास किंवा वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाईकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Deenanath Mangeshkar Hospital । अनामत रक्कम मागण्यासाठी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या डोक्यात कुठून आला ‘राहू केतू’ – डॉ. धनंजय केळकर

 

 

८९ रुग्णालयांवर आरोग्य विभागाने केली कारवाई

 

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील रुग्णालयांची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील ८६० रुग्णालयांनी तपासणी करण्यात आली. या तपासणीस दर्जेदार सेवा, रुग्णांना सेवा मिळण्यास काही अडचणी आहेत का या पाहणीसह रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक लावणे, टोल फ्री क्रमांक लावले आहे का याची तपासणी केली जाते. या तपासणी मोहिमेदरम्यान ८९ रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळून आल्याने या प्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे.

 

 

Local ad 1