Acb trap | लाच स्वीकारणे उपजिल्हाधिकारी महिलेला पडले महागात

Acb trap osmanabad उस्मानाबाद : वाळुचे बेकायदा उत्खनन आणि वाहतुकीला बंदी असून, ते रोखण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र, आर्थिक फायद्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील एका उपजिल्हाधिकारी असलेल्या महिलेने बेकायदा वाळू वाहतूक करताना कारवाई न करण्यासाठी एक लाख दहा हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. (Excitement in the revenue department) 

 

उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून दरमहा लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 लाख 10 हजारांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार रुपयांची लाच (Compromise by demanding 1 lakh 10 thousand and bribe of 90 thousand and 20 thousand rupees) उपविभागीय अधिकारी मनिषा अरुण राशिनकर (Sub Division Officer Manisha Arun Rashinkar) यांनी कोतवाल विलास नरसींग जानकर यांच्या मार्फत स्विकारली. त्यावेळी अटक करण्यात आली. (Acb trap osmanabad)

परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Acb trap osmanaba)

Local ad 1