पीसीएमसी ते स्वारगेट आतंर मेट्रोने 34 मिनिटांत होणार पूर्ण ; मोजावे लागणार 35 रुपये भाडे
अखेर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार
पुणे. पुणेकरांची बहुप्रतिक्षित जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेवर (District Court to Swargate Metro Corridor) रविवारपासून मेट्रो धावणार आहे. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भुयारी मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी १२.३० वाजता दूरदृष्य प्रणालीद्वारे होणार आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा १ ज्यामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनझ ते रामवाडी या दोन मार्गिका आहेत. ते पुर्ण झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) गुरुवारी उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर येणार होणार होते. मात्र, नियोजित सभास्थळी पावसामुळे चिखल झाल्याने ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदी हे पुण्यात न येता ते आभासी पद्धतीने मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (PCMC to Swargate will be completed in 34 minutes by internal metro; 35 rupees fare to be paid)
या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट (Kasba Peth, Budhwar Peth, Mandai, Swargate Metro Station) हा भाग मेट्रो नेटवर्कने जोडला जाणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर दुपारी ४ वाजता या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर थेट पीसीएमसी ते स्वारगेट (PCMC to Swargate) हा प्रवास या मार्गावर करणे शक्य होणार आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी 34 मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी 35 रुपये भाडे असणार आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.
या मार्गीकेतील बुधवारपेठ-कसबापेठ हे स्थानक लाल महाल, शनिवार वाडा, कसबा गणपती, इलेक्ट्रिक मार्केट, यांच्या जवळ असून त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्याप्रमाणावर फायदा होणार आहे. तसेच मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून महात्मा फुले मंडई, तांबट आळी, तुळशीबाग, भांडी मार्केट, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज शक्य होणार आहे. या भागात प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने तेथे लोक जाण्याचे टाळत होते परंतु आता मेट्रो पोहोचल्यामुळे या भागातील व्यापार उदीम यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
स्वारगेट मेट्रो स्थानक हे एसटी स्थानक आणि पीएमपीएमएल बस डेपो यांच्या जवळच बांधण्यात आले आहे. त्यामुळे येथे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन हब तयार झाले आहे. एसटी तथा पीएमपीएल बसने आलेले प्रवासी शहराच्या दूरवरती भागांना जसे की पीसीएमसी, रामवाडी, वनाज येथे सहज जाऊ शकतील शहरातील विविध भागातील लोकांना स्वारगेट येथे जाऊन एसटी बाबत घेणे विनासयास शक्य होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक ते एसटी स्थानक हे लवकरच भूमिगत पादचारी मार्गाने जोडले जाणार आहे, त्यामुळे प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज पडणार नाही.
उद्या दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होणार असून दुपारी १२.३० ते १.०५ या दरम्यान माननीय पंतप्रधान दूरदृष्य प्रणालीद्वारे याचे उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात स्वारगेट ते कात्रज या नवीन दक्षिण विस्तारित मार्गीकेचे भूमिपूजन देखील होणार आहे. या मार्गिकेची लांबी ५.४६ किमी असुन या मार्गिकेचा एकूण खर्च २९५५ कोटी आहे. या मार्गिकेवर मार्केट यार्ड, पद्मावती, बालाजी नगर आणि कात्रज हि ४ स्थानके आहेत. या मार्गामुळे पद्मावती, बालाजी नगर, धनकवडी, कात्रज (Padmavati, Balaji Nagar, Dhankawadi, Katraj Metro Station) हे भाग मेट्रो द्वारा जोडले जाणार आहेत. या २ मेट्रो प्रकल्पांच्या उद्घटन व भूमिपूजनाबरोबर मोदी सोलापूर विमानतळाचे (Solapur Airport) उद्घाटन, पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन आणि बिडकीन प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण करणार आहेत.