नांदेड : रस्ते खराब असल्यामुळेच अपघात होतात असे नाही. चांगले रस्ते (Good roads) असले तरी अपघातांची संख्या कमी होत नाही. वाहन चालवितांना असलेले नियम व मर्यादांचे उल्लंघन (Violation of rules and regulations) झाल्यानेच सर्वाधिक अपघात घडतात (Accidents) हे दुर्लक्षून चालत नाही. वाहतुकीला शिस्त यावी यासाठी शहरात जागोजागी आपण सिग्नल लावले आहेत. याबाबत असलेल्या नियमांच्या पालनासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागते अशी स्थिती आहे. स्वयंशिस्त आणि जबाबदार वाहतुक यातच आपल्याला अपघाताचे प्रमाण कमी करता येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले.(The District Collector told the formula to prevent road accidents)