नांदेड : जिल्ह्यातील वृत्तपत्र अर्थात दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, द्विपाक्षिक आदींना कायदानुसार रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया (आरएनआय) यांच्याकडे रीतसर नोंदणी करणे व टायटल पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल 156 वृत्तपत्रांननी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यासर्वांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बाजवली असून, दिलेल्या तारखेला उपस्थितीत राहावे, असे आदेश दिले आहेत. (District Collector issues notices to 156 newspapers in Nanded district)
प्रेस ॲन्ड रजिस्ट्रेशन्स ऑफ बुक्स ॲक्ट 1867 नुसार ही माहिती त्या-त्या वृत्तपत्रातर्फे जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे रीतसर सादर केल्याने ही कायदेशीर जबाबदारी संबंधितावर येते. वृत्तपत्राचे मालक, प्रकाशक यांनी दरवर्षी आपले वार्षिक विवरण विहित नमुन्यात दरवर्षी 31 मे पूर्वी आरएनआयकडे सादर केली पाहिजेत. पीआरबी ॲक्ट 1867 च्या सेक्शन 19 डी नुसार हे स्पष्टही करण्यात आले आहे. (District Collector issues notices to 156 newspapers in Nanded district)
नांदेड जिल्ह्यातील तब्बल 156 वृत्तपत्रांनी ही कार्यवाही पूर्ण केल्याचे आढळून आले नाही. ज्या वृत्तपत्रांनी 3 वर्षाचे विवरणपत्र भरले नाहीत त्यांना शेवटची संधी म्हणून जानेवारी 2020 पर्यंत मुदत दिलेली होती. आरएनआयच्या अभिलेख्याशी पडताळणी केली असता नांदेड येथून तब्बल 156 वृत्तपत्रांनी आपले विवरण सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याची यादी आरएनआयने पडताळणी व चौकशीसाठी जिल्हादंडाधिकारी नांदेड यांच्याकडे पाठविली आहे. त्यांनी दिलेल्या यादीतील वृत्तपत्रांनी गत पाच वर्षात आपले अंक प्रसिद्ध केले किंवा नाही याचीही चौकशी करण्याचे निर्देशीत केले आहेत. (District Collector issues notices to 156 newspapers in Nanded district)
ज्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात (फॉर्म 1) दिल्याप्रमाणे जर अंक प्रकाशित केले नसतील तर सदर वृत्तपत्राची नोंदणी पीआरबी ॲक्ट 1867 मधील सेक्शन 8 नुसार रद्द करण्याचे प्रस्तावित केले आहे. चौकशी अंती जर यात कमतरता आढळली तर त्यांची नावे कळविण्याबाबत आरएनआयचे अतिरिक्त प्रेस रजीस्ट्रार रिना सोनुवाल यांनी नांदेड जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. (District Collector issues notices to 156 newspapers in Nanded district)