(Food packets) व्हीक्टरी चित्रपटगृहातील कामगारांना अन्नधान्य कीटचे वाटप
पुणे : पुणे लष्कर भागात सामाजिक काम करणाऱ्या कर्तव्य फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अशोक देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लष्कर भागातील व्हीक्टरी चित्रपटगृहातील कामगारांना लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या हस्ते अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. (Distribution of free food packets)
यावेळी प.महाराष्ट्र रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन दुधाणे, सहा.पोलीस निरीक्षक हरिष शिळमकर, पाॅवरलिफ्टर शाम साहनी, सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पवार, डॉ.बंटी धर्मा, अशोक देशमुख, विकास भांबुरे, सचिन कांबळे, दिलीप भिकुले, विजय भोसले, राजेश सहेरीया ,कमलेश गोडसे, आकाश ढसाळ, उमेश गायकवाड, चित्रपटगृहाचे व्यवस्थापक जहीर शेख आदी उपस्थित होते.(Distribution of free food packets)
कोरोना संसर्गामुळे गेली दोन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्यामुळे अशोक देशमुख यांनी कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून व्हीक्टरी चित्रपटगृहातील कामगारांना वाढदिवसानिमित्त अन्नधान्य कीटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली, असे मत पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी व्यक्त केले. (Distribution of free food packets)
फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले. (Distribution of free food packets)