सगळं कामकाज बाजूला ठेवा आधी MPSC वर चर्चा करा: देवेंद्र फडणवीस

मुंबई : विधिमंडळाच्या (Maharashtra Monsoon Session 2021) कामकाजाला सुरुवात झाली. परंतु विरोधकांनी सुरुवातीलाच एमपीएससी (MPSC) आणि स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) आत्महत्येवरुन सरकारला धारेवर धरलं. “सगळं कामकाज बाजूला ठेवा आधी MPSC वर चर्चा व्हायलाच हवी, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. Discuss MPSC, setting aside all work

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे पडसाद आधिवेशाच्या पहिल्याच दिवसी सोमवारी (दि 5) विधिमंडळात उमटलेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत सरकार एमपीएससीवर (MPSC) काय पावले उचलणार आहे, हे जाहीर करावे, असे आव्हान दिले. स्वप्निलची सुसाईड नोट फडणवीसांनी सभागृहात वाचून दाखवली. ही सुसाईट नोट अतिशय संवेदनशील आहे. कोणाच्याही हृदयाला पाझर फुटेल असे हे पत्र आहे. सरकारला पाझर फुटणार आहे की नाही?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. 

एमपीएससीला (MPSC) स्वायत्तता दिली. परंतु स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही, असे सांगत दीड दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत, मुलाखती होत नाहीत, मुलाखती झाल्या तर नियुक्त्या नाहीत, त्यामुळे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत सापडलेले आहेत.  एमपीएससी (MPSC) बोर्डावर लोक नाहीत, सरकार पावले उचलायला तयार नाही. सरकार विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाही, असा हल्लाबोल फडणवीसांनी सरकारवर केला. आणखी किती स्वप्नील लोणकरने आत्महत्या करायला पाहिजे म्हणजे सरकारला जाग येईल, असा खडा सवाल देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (MPSC)

*धक्कादायक : एमपीएससी क्रॅक करूनही नोकरी न मिळाल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या*#MPSC#student#pune#suicidehttps://bit.ly/3ArrYuP

Local ad 1