नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू (Disarmament and mobilization orders enforced)

नांदेड :  जिल्ह्यात 8 मार्च रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 22 मार्च मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येवरुन हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई केली जाणार आहे. (Disarmament and mobilization orders enforced)

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार (8 मार्च) सकाळी 6 वाजल्यापासून शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, तो 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यं लागू रहणार आहे. या आदेश नुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास परिसरात जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. (Disarmament and mobilization orders enforced)

मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त जणांना जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

Local ad 1