Pune crime news : वॉल्वो कंपनीच्या लक्झरी बसमधून थेट विदेशी मद्याची वाहतूक
Pune crime news : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) आंबेगाव बु.येथील स्वामी नारायण मंदिराजवळ गोवा (Goa) राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्याचे बाॅक्स लक्झरी बस (Luxury bus) मधून तीन चाकी रिक्षा मध्ये भरले जात होते. त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छप्पा टाकून मद्यासह लक्झरी बस आणि रिक्षा जप्त केला आहे. (Direct foreign liquor transport from Volvo Company’s luxury buses)
कारवाईत आरोपी मंगेश पोपट मोरे, अक्षय बाळासाहेब हुलगे, पंकज देवनारायण निसाद व रविंद्र अशोक घारगे यांना अटक करण्यात आली असून मा.न्यायालयात हजर केले असता न्यायलायाकडून आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Direct foreign liquor transport from Volvo Company’s luxury buses)
उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव बु. गावचे हद्दीतीलस्वामी नारायण मंदिरासमोर, पुणे बँगलोर महामार्गालगत, आंबेगाव बु. पुणे येथे गोवा राज्यातून (State of Goa) भारतीय बनावटीचे विदेशी मद्य विक्रीसाठी आंबेगाव-कात्रज परिसरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्वामी नारायण मंदिराजवळ, छापा टाकून गोवा बनावटीचे मद्य (Goa made wine) व बिअरचा साठा वॉल्वो कंपनीची लक्झरी बस क्र.MH-४७-Y ६०३०, मधून उतरवून घेवून बजाज कंपनीची तीनचाकी रिक्षा क्र.MH-१२-QE-४८४७ मध्ये भरत असताना अढळले.
तीन चाकी रिक्षा ज्या ठिकाणी गोवा बनावटीचे विदेशी मद्य घेवून जाणार आहे. त्या ठिकाणी स.नं. ६५, गल्ली नं. ६ अंजनीनगर कात्रज, पुणे ४६. छापा टाकून रविंद्र अशोक घारगे यांचे राहते घरात गोवा बनावटीचे विदेशी मद्य व बिअर असा एकुण ३ लाख ९३ हजार ७२० रुपये किमंतीचा मुद्येमाल आढळून आला. त्यामध्ये विदेशी मद्याचे व बिअरचे एकुण ४५ बॉक्स तसेच वॉल्वो कंपनीची लक्झरी बस व तीनचाकी रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप (State Excise Commissioner Kantilal Umap) संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर (Divisional Deputy Commissioner Anil Chaskar), अधीक्षक सी.पी. राजपूत (Superintendent C.P. Rajput), उप अधीक्षक युवराज शिंदे व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी विभाग, पुणे यांनी केली. निरीक्षक आर.पी.शेवाळे, एस.एल. पाटील, टी.बी. शिंदे, तर दुय्यम निरीक्षक, चंद्रकांत रासकर, राजेंद्र झोळ, संजय राणे, प्रशांत दळवी, राम सुपेकर, अमित वालेकर, योगेंद्र लोळे, संकेत वामन, कर्मचारी राजेश पाटील, शरद भोर, समिर पडवळ, राजू पोटे, महेश बनसोडे, रणजित चव्हाण, दत्ता पिलावरे, नवनाथ पडवळ, वासूदेव परते, उज्वला भाबड यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला. (Direct foreign liquor transport from Volvo Company’s luxury buses)