बिग ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Dilip Kumar)

दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज ही देखील देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उचरा दरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा आल्या. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सांगत होत्या. परंतु आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या चाहत्यांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी वाईट उगवली.  (Dilip Kumar)

दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. परंतु ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. बॉम्बे टॉकिजने 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केले. तर 1998 ला आलेली किला हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. (Dilip Kumar)

दिलीप कुमार यांचे सुपरहिट चित्रपट

अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत. (Dilip Kumar)

Local ad 1