नांदेडकरांसाठी चांगली बातमी ; “हा” नंबर डायल करा अन् पोलिसांची मदत घ्या…

नांदेड : नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी आणि कोणत्याही वाईट प्रसंग घडण्या आगोदर पोलिसांना निरोप मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळावर हजर राहता यावे यासाठी पोलिस सक्षम केले जात आहे. त्यादृष्टीनेच जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात (Nanded police force) आता 14 चारचाकी व 76 दुचाकीची भर पडली आहे. तुम्हांला असुरक्षित वाटत असेल तर 112 हा नंबर डायल केल्यास गरजूला आवश्यक त्या सर्व सुरक्षिततेच्या सुविधा मिळणार आहेत. (By dialing 112, the needy will get all the necessary security facilities.)

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या पोलीस मदतीच्या या सेवेला मजबुत करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण (Nanded guardian minister ashok chavan) यांनी जिल्हा नियोजन समितीकडून निधीची उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून नांदेड जिल्हा पोलिस दलांची कार्यक्षमता वाढण्यास मोलाची मदत होऊन गरजू नागरिकांना तात्काळ सेवा उपलब्ध होणार आहेत.

 

 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही वाहने पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संवाद साधून पोलिसांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी (Nisar Tamboli, Deputy Inspector General of Police, Nanded) यांनी केले. (By dialing 112, the needy will get all the necessary security facilities.)

यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. (MLA Amar Rajurkar, MLA Mohan Humberde, MLA Balaji Kalyankar, MLA Madhavrao Patil Jawalgaonkar, Superintendent of Police Pramod Shewale)  नांदेड जिल्ह्याच्या पोलीस विभागाला 45 चारचाकी वाहने व 76 दुचाकी वाहनाची मंजुरी दिली आहे. (By dialing 112, the needy will get all the necessary security facilities.)

 

Local ad 1